‘दुसऱ्या फाळणी’ची शक्यता वर्तवण्यापूर्वी या कथा वाचायला हव्यात. नाहीतर पुन्हा एकदा माणुसकीचा मुडदा बेवारसपणे रस्त्यावर पडलेला आपल्याला पहावा लागेल!
हल्ली दुसऱ्या फाळणीची चर्चा होऊ लागली आहे. ती अटळ आहे किंवा आपला देश हळूहळू त्या दिशेने चालला आहे. त्याची चर्चा करण्याआधी पहिली फाळणी, तिचे परिणाम समजावून घ्यायला हवेत. प्रसिद्ध अनुवादक चंद्रकांत भोंजाळ यांनी हिंदी-उर्दूतील भारतीय लेखकांच्या एकंदर १७ कथांचा या संग्रहात अनुवाद केला आहे. मंटो, कृष्णा सोबती, भीष्म साहनी, कुर्रतुल-एन-हैदर, अज्ञेय, गुलज़ार, उपेन्द्रनाथ अश्क अशा मान्यवर लेखकांच्या या कथा आहेत.......